मी मृणालिनी घार्गे-पाटील, घंटाळीच्या 2015 च्या डिप्लोमा बॅचची विद्यार्थिनी.. सहयोग मंदिराच्या तिसर्या मजल्यावरील क्लास आम्ही मैत्रिणी कायम miss करतो... त्यानंतर मी घरी साधना करायचे... पण त्यात सातत्य नसे...आज मूड आला सर्व साधना केली..उद्या कंटाळा आला...फक्त बसूनच आसने करूया... असे व्हायचे... बेसिकली मला योगाची आवड आहे.. त्यामुळे काही तरी करायचे... पण आपले online क्लास सुरू झाल्याने पूर्ण साधना होऊ लागली... एकटे करण्यापेक्षा सोबत करायला मजा येते👍👍..मग ते virtual का असेना..😄 लाॅकडाउनच्या काळात, सर्वांना मानसिक आधाराची गरज होती ... तेव्हा आपले online क्लास चालू झाल्याने सर्वांनाच त्याचा फायदा झाला.... तेव्हा कोणी कोणाला भेटू शकत नव्हते...लोक एकाकी पडले होते...ते आपल्या क्लासमुळे connected राहिले ... रोजच्या साधनेने या pandemicचा सामना करण्याचे बळ आले..

मी जिल्हाधिकारी कार्यालयात, लेखाधिकारी आहे त्यामुळे सुरूवातीपासून अत्यावश्यक सेवेत होते... रोज ऑफिस, कामवाली नसल्याने सर्व घरकाम, करोनाचे सोपस्कार याने थकून जायचे पण आपल्या साधनेने बळ यायचे त्यामुळे साधना चुकवली नाही... जुलैमध्ये मला व माझ्या 10 वर्षाच्या मुलाला करोनाची बाधा झाली.. त्या अवघड परिस्थितीतून बाहेर पडण्याची मानसिक ताकत रोजच्या साधनेने प्राप्त झाली... त्यावेळी बालसंस्कार वर्गही चालू होता...मुलाला तो ही करायला लावायचे त्यामुळे तो थोडा divert व्हायचा ... मला तेव्हा weakness मुळे सर्व करता येत नसे पण शयन,बैठक स्थितीतील आसने आणि प्राणायाम करत असे... सध्याच्या परिस्थितीतून आपली साधनाच आपल्याला बाहेर काढू शकते हा माझा स्वानुभव आहे... त्या कठीण काळात आपल्या योगशिक्षिका व माझ्या सख्या विद्या दाते आणि प्रिया नारखेडे यांनी मला खूप मदत केली... मानसिक सपोर्ट तर दिलाच पण इतरही सर्व मदत केली...

या लाॅकडाउनच्या काळात एक गरज म्हणून निर्माण झालेला आपला online वर्ग पुढेही असाच चालू ठेवावा हीच माझीही विनंती आहे... ज्यांना साधना करायची इच्छा आहे पण वेळ आणि distance चा प्राॅब्लेम आहे त्या सर्वांना याचा लाभ होईल... घंटाळीचे सर्व शिक्षक, संयोजक यांनी नवीन तंत्रज्ञान शिकून योगाचे सातत्य राखण्याचे जे प्रयत्न केले ते खरोखरच अभिनंदनीय आहेत ...



हरी ओम 🙏🏻🙏🏻

मी सौ. निलीमा चौधरी

जळगाव ला राहते.

मी तुमच्या मंडळाचे नाव खुप ऐकले होते पण कधी वाटले नव्हते कि तुमच्या बरोबर योग साधना करायला मिळेल.
जेव्हा पासून लाॅकडाऊन सुरू झाले, तेव्हापासून मी आपले योगनिद्रा, प्राणायाम वर्ग आणि सूर्य नमस्कार वर्ग केले आणि तेव्हापासूनच सराव वर्ग देखिल नियमित चालू केला आहे. प्रत्येक बॅच करत आले, प्रत्येक वेळेला खुप वेगवेगळे शिकायला मिळाले आणि त्यातच मी आता डिप्लोमाला पण ॲडमिशन घेतली. खुप छान वाटतं आणि सर्व शिक्षक पण खुप छान आहेत. खुप छान सांगतात

खुप खुप धन्यवाद हरी ओम


                                  
                 
                   
 


 
   

Designed & Hosted by : MID   Promoted by : GID